Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

NAMO SHETKARI SANMAN NIDHI YOJNA : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार

 

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 


नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय आत्ताच्या ताज्या माहिती नुसार शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार राबवत असलेल्या" नमो शेतकरी सन्मान निधी योजना" राबवण्यासाठी राज्य सरकार ने नुकताच GR जाहीर करण्यात आला आहे .नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी ३२ लाख शेतकऱ्यांनी निकषांची पूर्तता केली नाही त्यामुळे हे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत .या योजनेत ७१ लाख शेतकऱ्यान पेकी ३२ लाख शेतकरी पात्र ठरणार नाहीत .

शेतकरी मित्रानो आपण सर्वांना माहित आहे . की , शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात येत आहे .त्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्य स्थरावर राबवण्याचा निर्णय घेतला होता .शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येते केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयानुसार राज्यात शेतकरी सन्मान निधी योजंना राबवली जात आहे संदर्भ क्र .२ नुसार शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारंना देखील करण्यात आली आहे .

केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेचे पात्रतेचे शेतकरी हे नमो शेतकरी निधी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत .पण ,काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती .आता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत .याची माहित प्रसिद्ध करण्यात आलेल्या GR मध्ये देण्यात आली आहे

काय आहे NAMO SHETKRI SANMAN NIDHI YOJNA?

Namo Shetkari Sanman Nidhi Yojna First Installment:महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी PM KISAN YOJNA न च्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सुरवात करण्याची घोषणा केली होती .त्यात त्यांनी सांगितले कि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी आम्ही हि योजना सुरु करणार आहोत . हि योजना सुरु केल्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्याची शक्यता थोड्याफार प्रमणावर वाढणार आहे .

या योजनेसाठी ३०-५-२०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे .या बैठकीत हि योजना राबवण्यासाठी मार्गदर्शक धोरण ठरवण्यासाठी चर्चा देखील करण्यात आली आहे .हि योजना शक्यतो .PM KISAN YOJNAच्या शेतकऱ्याच्या अनुदानात भर घालण्यासाठी तयार करण्यात आली आहे.असे प्रथमदर्शनी दिसून येते . 


                                                                           👇👇👇👇👇👇

                                    नमो    शेतकरी सन्मान निधी योजनेचा GR पाहण्यासाठी येथे 

                                                                              क्लिक करा 

१.Namo Shetkari Sanman Nidhi Yojna:लाभार्थी

  • नमो शेतकरी सन्मान निधी योजने करता निकष हे जवळपास Pm Kisan योजनेच्या प्रमाणेच आहेत .
  • Pm Kisan योजनेच्या प्रमाणेच नमो शेतकरी योजनेच्या धर्ती वर सुरु करण्यात आल्यामुळे या योजनेसाठी नोंदणी हि पंतप्रधान किसान योजनेच्या पोर्टल वर होणार आहे .पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजना हि केंद्र सरकारच्या प्रणाली प्रमाणे कार्य करणार आहे या योजनेमध्ये अलीकडेच झालेली सुधारणा म्हणजे e kyc या योजनेसाठी बंधनकारक करण्यात आली आहे .ज्या शेतकऱ्यांची ekyc झाली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येनार आहेत .या योजनेसाठी Pm kisan योजनेसाठी पात्र ठरलेले सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत .तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेत केलेले बदल तत्काळ नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यांना लागू होणार आहे .या योजनेकरित महाराष्ट्र शासनाकडून नवीन शासन निर्णय जाहीर केला जाणार नाही. तो केंद्र शासनाचा वापरला जाणार आहे .
  • पंतप्रधान किसान योजनेच्या नवीन लाभार्थ्याचा यात समावेश आहे कि नाही या बाबद शंका होती .पण नवीन लाभार्थ्याला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे .

Namo Shetkari Yojne चे पैसे कसे मिळणार ?

Pm Kisan योजनेच्या pfms प्रणालीद्वारे DBT द्वारे पैसे ज्या प्रमाणे पडत होते त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार आहेत .

नमो शेतकरी योजना अटी व पात्रता
नमो शेतकरी योजना अटी व पात्रता 



नमो शेतकरी योजनेची पात्रता व अट काय आहे ?

  1. या योजने अंतर्गत अर्ज भरवायचा असल्यास शेतीचा सातबारा शेतकऱ्याच्या नावे असणे महत्वाचे आहे .
  2. ज्या शेतकऱ्यांच्या नावे एक गुंठे २ गुंठे जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत .
  3. या योजनेमध्ये एका सद्शाच्या नावे या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
  4. घरातील सदस्या पैकी कोणी सरकारी नोकरी साठी असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही .
  5. ज्यांना १० हजाराच्या वर पेन्शन मिळत असेल त्यांना या योजनेचा फायदा नाही .

हि योजना सुरु होत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले केंद्र सरकारने जशी Pm Kisan yojna सुरु केली त्याच प्रमाणे आम्ही देखील शेतकऱ्यांसाठी ६००० मदतीची हि योजना सुरु करत आहोत .केंद्र सरकारचे ६००० आणि राज्यसरकारचे ६००० या प्रमाणे १२००० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील .त्याचप्रमाणे शेतकरी जे पिक विमा भरत होता तो देखील राज्य सरकार भरेल शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये भरायचे .

नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर हि योजना सुरु करण्यात आली आहे .या योजनेमुळे एकाच वेळी केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे मिळणार आहेत .राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून तीन हप्त्यात ६००० हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारच्या योजनेचे निकष या योजनेस लागू आहेत .मात्र ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .या अगोदर फक्त pm kisan yojana चे निधी वितरण झाले होते पण आता ऑगस्ट महिन्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वर्ग केले जातील .

राज्याचा कृषी विभाग या योजनेचा लाभ कसा जास्त शेतकऱ्यांना मिळणार याची दखल घेत आहे .या अगोदर राज्यातील २६ लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचे आढळले नव्हते .त्या शेतकऱ्यांना राज्यसरकारने गोव्वोगावी जाऊन वाचली जाणार होती ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीतून कायमस्वरूपी डिलीट केली जाणार आहेत .त्यामुळे शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केली असेल हि अपेक्षा नमो शेतकरी योजनेविषयी माहिती आपण वरीलप्रमाणे दिली आहे .

शेतकरी सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता आज दिनांक २७ जुलै २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतोय .राजस्थान मधील शिकर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे .या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १७००० कोटी रुपये वर्ग केली जाणार आहेत .या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांचा लाभ केंद्र सरकार देते. तरी या योजनेस जोडून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे .या योजनेअंतर्गत पुढील कालावधीत राज्य सरकार या योजनेसाठी ६००० ऐवजी १२००० रुपये देणार आहे .केंद्राच्या योजने बरोबरच राज्याच्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जातात .



                                                            वरील योजनेचे लाभार्थी  यादी  पाहण्यासाठी  

                                                                             येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या