Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

MINORITY SCHOOL TET EXAM COMPALSARY |अल्पसंख्याक शाळांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे .

 नमस्कार विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वांना माहिती आहे .कि .राज्यात वाढत्या बेरोजगारी संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे .यातच शासनाकडे असणाऱ्या रिक्त पदांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे .शासनाकडील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे .शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी पदभरती करिता शासनाने नुकतीच टीएआयटी परीक्षा २०२५ घेण्यात आली आहे .त्यानुसार राज्य शासन शिक्षक कर्मचारी पदभरती करणार  आहे .

MINORITY SCHOOL TET EXAM COMPALSARY
MINORITY SCHOOL TET EXAM COMPALSARY


TAIT UPDATE;

विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वांना माहित आहे .कि ,शिक्षक होण्यासाठी सरकाने २००९ साला पासून टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे .त्यानुसार राज्यातील आश्रमशाळा तसेच अल्पसंख्याक शाळा वगळता सर्व शाळेकरिता शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले  होते .त्यानुसार शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना शिक्षक अभियोगीता परीक्षा पास होणे अनिवार्य आहे .

परंतु शासनाने आत्ता राज्यातील जवळपास सर्व शाळांकरित शिक्षक अभियोगीता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे .या अगोदर आश्रम शाळांकरिता आणि अल्पसंख्याक शाळेकरिता शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य नव्हते .पण,आता राज्यातील सर्वच शाळेकरिता टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आपणासर्वांना माहित आहे .कि,टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता .इतर मागास घटकांसाठी १५० गुणांपैकी ८२ गुण घेणे अनिवार्य करण्यात आले  आहे .तर ,खुल्या वर्गाकरिता ९० गुण घेऊन पात्र होणे गरजेचे आहे .आता शिक्षक पात्रता  परीक्षा उत्तीर्ण होऊनच शिक्षक होता येते .हि परीक्षा आत्ता १ ली ते ८ वी वर्गाकरिता शिक्षक होऊ पाहणाऱ्या विध्यार्थ्यांना लागू आहे .त्यावरील वर्गाकरिता शिक्षक पात्रता पतीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य नाही .

नुकत्याच शासनाने इतर मागास विभागाच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्रकात शिक्षक पात्रता पतीक्षा अनिवार्य करण्याबाबत सूतोवाच करण्यात आले आहे .त्याच बरोबर सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देखील शिक्षक अभियोगीता परीक्षा आत्ता सर्व शिक्षकांना अनिवार्य करण्या नमूद करण्यात आले आहे .

सर्वोच्य न्यालयाने दिलेला निर्णय ;

१.राज्यातील सर्व शाळांकरिता हा निर्णय अनिवार्य राहील .

२.ज्या शिक्षकांची सेवा  ५ किंवा ५ पेक्षा कमी वर्ष राहिली आहे .अश्या शिक्षकांकरिता शिक्षक अभियोगीता परीक्षेतून सुट रहिल .

३.ज्या शिक्षकांची सेवा हि ५ वर्षा पेक्षा जास्त राहिली आहे .अशा शिक्षकांना २ वर्षा मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे .

नुकत्याच अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख प्यारे खान यांनी देखील अल्पसंख्याक विभागातील शाळांकरिता टीईटी परीक्षा पास करणे अनिवार्य करण्यात यावे. अशी मागणी करण्यात यावी .त्या वेळेस ते म्हणाले उत्तम दर्जाचे आणि अभियोगीता धारक शिक्षक मिळणे हा अल्पसंख्याक शाळेतील विध्यार्थांचा हक्क आहे .

TET EXAM SYLLABUS;

शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेकरिता खूप जबाबदारीने अभ्यासक्रम तयार केला आहे .

वर्ग १ व ५ करिता अभ्यासक्रम

१.मराठी 

२.इंग्रजी

३.गणित 

४.मानसशास्त्र 

५.परिसर अभ्यास 

या परीक्षेकरिता एकूण ५ विषय असून प्रत्यक विषय हा ३० गुणांनकरिता आहे .हे सर्व विषय मिळून १५० गुणांचा पेपर आहे .

वर्ग ६ ते ८ करिता अभ्यासक्रम ;

१.मराठी 

२.इंग्रजी 

३.बी .एड करिता असणारा ६० गुणांचा विषय 

४.मानसशास्त्र 

या परीक्षेकरिता एकूण ४ व  विषय असतात .यापैकी ३ विषय हे प्रत्यक विषय हा ३० गुणांकरिता व बी .एड करिता असणारा विषय हा ६० गुणांकरिता अशे मिळून १५० गुणांचा पेपर आहे .

TET EXAM ELIGIBLITY;

शिक्षक पात्रता परीक्षा दोन स्तरावर राज्य सरकार द्वारे घेतली जात आहे .१ ते ५ या वर्गाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ घेतला जातो .तर या करिता उमेदवार  डीएड उत्तीर्ण झालेला असणे गरजेचे आहे .

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ पास होण्यासाठी बी .एड उत्तीर्ण असणे गरजेचे आहे .

TET EXAM DATE :टीईटी परीक्षेची तारीख 

नमस्कार मित्रांनो नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षेकरिता अर्ज भरण्यात आले आहेत .ही परीक्षा नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे .गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेकरिता अर्ज सादर करणारांची संख्या कमालीची वाढली आहे .या वर्षी अर्ज सादर करणाऱ्यांची जवळपास ४.७५ लाखांच्या घरात गेली आहे .टीईटी परीक्षा आत्ता सर्वच शाळेकरिता अनिवार्य करण्यात आल्यामुळे सर्वच शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे अनिवार्य आहे .त्यांमुळे सर्व विध्यार्थ्यानी टीईटी परीक्षेचा अभ्यास गांभीर्याने करणे गरजेचे आहे .

हे देखील वाचा ;

NMMS QUESTION PART ;1 |एन एम एम एस प्रश्न भाग ;१

 टीईटी परीक्षेकरिता शासननिर्णय वाचण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या